top of page

Fri, 08 Sept

|

Muscat

Carrom and Chess Competition

Registration is closed
See other events

Time & Location

08 Sept 2023, 9:00 am – 10:00 pm

Muscat, JG9Q+85V, 1911 Way, Muscat, Oman

About The Event

नमस्कार मंडळी,

शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मंडळाने केले आहे. जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटूया.

कॅरम स्पर्धा पुढील पाच विभागांत खेळवली जाईल -

१) पुरुष एकल (Gents single)

२) महिला एकल (ladies single)

३) दुहेरी - अ) पुरुष गट (Gents doubles)

               ब) महिला गट (Ladies doubles)

               क) मिश्र गट : एक महिला एक पुरुष (Mix doubles)

४) लहान मुले एकल (१२ वर्षे पर्यंत) (kids single)

५) लहान मुले दुहेरी (१२ वर्षे पर्यंत) (kids doubles)

यंदा, आपला दुहेरी स्पर्धेत सहकारी देण्याची जबाबदारी मिश्र दुहेरी स्पर्धा वगळता समिती घेणार आहे. आपण आपल्याला कोणकोणत्या दुहेरी स्पर्धेत खेळायचे आहे त्याची नोंद करायची आहे. नोंद झालेल्या नावांमधून लॉटरी पद्धतीने प्रत्येकाचे सहकारी निवडले जातील आणि त्यानुसार जोड्या ठरतील. फक्त मिश्र दुहेरी साठी आपण आपला सहकारी निवडून त्याची नोंद गुगल फॉर्म मध्ये करायची आहे. 

बुद्धिबळ स्पर्धा देखील याच दिवशी खेळवण्यात येईल. बुद्धिबळासाठी खुला गट आणि लहान मुले (१२ वर्षे पर्यंत) असे दोन गट असतील. प्रत्येक गटात किमान १० स्पर्धक खेळाडू सहभागी झाले तरच बुद्धिबळ स्पर्धा खेळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धेआधी योग्य वेळी सांगण्यात येतील.

स्पर्धेसाठीची नावनोंदणी खालील लिंक द्वारे करता येईल.

https://forms.gle/RVNQXf86BfM9nXWV9

 नाव नोंदणीसाठी शेवटची तारीख - ३० ऑगस्ट २०२३ 

फक्त  २०२३ चे सभासद या स्पर्धेत भाग घेऊ शकतील, ज्यांनी अजून  २०२३ चे सभासदत्व घेतलेले नाही त्यांना सभासद झाल्यावर स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येईल.  २०२३ चे सभासदत्व घेण्यासाठी आपल्या मंडळाच्या कोणत्याही समिती सदस्याकडे संपर्क करू शकता.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

तेव्हा त्वरित नावनोंदणी करा आणि  ८ सप्टेंबरला स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या.

धन्यवाद

 ता. क. - या स्पर्धेच्या आयोजनानंतर लवकरच टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धा देखील भरवल्या जाणार आहेत.

Share This Event

bottom of page