top of page

संक्रांती शुभेच्छा

तीळा चे 2 प्रकार झाले आता, गावरान व पॉलिश त्याला म्हणता ।

फरक त्यातला कळला पहाता, हातात निरखून बघता बघता ।

गावरान जरी जवळचा वाटला, पॉलिश वाला नजरेत भरला ।

लपवून खायला गावरान बरा, दिखाव्याला पॉलिश असावा जरा ।

दोन्ही हातात समप्रमाणात ठेवले, पॉलिश हलके असल्याने जास्तच भरले ।

गावरान हे जड का आहे बरे? त्यावर आवरण अजूनही खरे!

आवरण माती च्या प्रेमाचे, आवरण दुःख लपविण्याचे ।

आवरण स्निग्धता जपण्याचे, आवरण संस्कृती जोपासण्याचे ।

पॉलिश तीळ दिसे सुंदर किती, सर्वात वेगळे छान चमचमती ।

आवरण त्याने फेकून दिले, जनतेला नेमके तेच भावले ।

आवरण संस्कृती चे मातीमोल, आवरण स्निग्धतेचे वाटे फोल ।

आता प्रजा ही दिखाव्यात मानते, जुनवाणी विचाराला थोतांड समजते ।

गुळाचे ही 2 प्रकार डब्यातून, नैसर्गिक व chemical असे विभागून ।

गावरान गूळ लाल सुंदर वरून, Chemical ने गोडवा घेतला ओढून ।

कसेही असुद्या हे बदल प्राकृतिक, आपसात प्रेम असुद्या मात्र नैसर्गिक ।

तिळा तिळा ने वाढवूया स्निग्धपणा, शब्दां मधून जपुया नैसर्गिक गोडपणा ।

संक्रांत जरी ठरल्या वेळी येई, गोड भाष्याला तिथी ची गरज नाही ।

तुम्ही आम्ही गावरान तिळा सारखे राहूया, आवरण ममतेचे, आपलेपणाचे पांघरुया ।

ह्या आवरणातुनी अनेक कुटुंबे जगती, जिव्हाळ्याचे अर्थपूर्ण जीवन जपती ।

Share केल्या वर्षभर संदेश आणि philosophy, कडूपणाला नेहमीच गोडव्याने दिली माफी ।

मकरसंक्रांतीच्या दिवशी, नव्या कालनिर्णया सारखे, नव्याने घेऊ निर्णय, होऊ कालच्या कडूपणाला पारखे ।

संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना स्निग्ध, गोड शुभेच्छा, गावरान तिळा सारखी व लाल गुळा सारखी, नैसर्गिक नाती ठेवा, ही च विनायक-वृंदा ची सदिच्छा


Recent Posts
bottom of page