स्वप्न रंगवतांना ,
दुः खाला जागाच नसते
सुखाच्या पावसात,
चिंबं चिंबं भिजायचे असते ...
स्वप्नांच्या जगात,
कल्पनांची गर्दी असते
वर्तमान झेलताना,
काटयांशीच सलगी असते ...
स्वप्न सत्यात उतरावतांना ,
दुः खाची साथ असते
सुखाच्या प्रत्येक क्षणाला ,
दुः खाचीच धार असते ...
सुख शोधता शोधता ,
स्वप्न विरून जातं
दुःख भोगता भोगता,
आयुष्य संपून जातं ..आयु ष्य संपून जातं
Please reload
Recent Posts
Please reload