top of page

माझीया माहेरा

जा जा रे पाखरा माझीया माहेरा .. माझीया माहेरा देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन वाट दाखवाया नीट माझी वेडी आठ्वण...... जा जा रे पाखरा ... जा जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा

अगंणात आई माझी तुळशीला पाणी देई हात जोडी बाई म्हणे , लेकीला ग सुख देई सांग तिच्या कानामधें , जीव तिथे गुंतला ... जा.. जा रे पाखरा ... जा.. जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा

ओसरीला बाबा माझा , चारा देई वासराला मनामधी घालमेल , सांभाळ देवा लेकराला ... सांग तू रे कानामधें , जीव तिथे गुतला जा.. जा रे पाखरा ... जा.. जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा

खाटेवरी आजी माझी , डोळे तिचे वाटेवरी नातं माझी सासुऱ्याला , सांभाळी बा लेकराला सांग तिच्या कानामधें , जीव तिथे गुंतला ... जा.. जा रे पाखरा ...

जा.. जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा

भाऊ माझा पाठीराखा , बंधु जसा द्रोपदीचा हाक देई साद घाली , शोधीतसे परिसाला सांग त्याच्या कानामधें , जीव भेटी आतुरला... जा.. जा रे पाखरा ... जा.. जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा


Recent Posts
bottom of page