लेक
लेक असते आपल्या ,बाबांची लाडकी राणी ,
मनातली तिची जागा ,घेऊच शकत नाही कोणी ।
मी सुध्दा माझ्या अप्पांच लाडक पिल्लू ,
हट्ट करायचे तेव्हा पासून ,जेव्हा अगदी होते टिल्लू ।
अप्पा म्हणजे आमचे ,मूर्तिमंत शिस्त ,
असूच शकत नाही त्यांच्या समोर ,घरातल कोणी बेशिस्त ।
लहानपणीच्या कष्टानीं त्यांना ,खूप काही शिकवलं,
स्व-कष्टाने शिक्षण घेताना ,सर्वांगाने घडवलं ।
तुटपुंज्या पैशात भागवताना ,खूप झाली चढाओढ ,
आईच्या साथीने तरीही बसवली ,संसाराची घडी बिनतोड ।
झंजिनिअरींग च बीज ,हळूवार रूजवल आमच्या मनात ,
कुठलही काम अशक्य नाही , हेच ठेवा नेहमी ध्यानात ।
आई वरच प्रेम त्यांनी ,कधी शब्दात नाही मांडल ,
मुलांवर संस्कार करता करता ,आम्ही त्यांच्या कृतीतूनच जाणलं ।
आईवर नुसत प्रेम नाही ,विश्वास होता पूर्ण ,
चौकटीत भागवताना सुध्दा ,घराला घरपण देईल संपूर्ण ।
खूप काही त्यांनी त्याच्या ,उदाहरणातून शिकवलं ,
आयुष्यभर शिकत रहाव , हे स्वत: करून दाखवल ।
अप्पा ,तुम्ही आमच्या करता , खूप काही केलत ,
आयुष्याच्या वाटेवर ,संस्कारांच सुख दिलत ।
या सुखाची परतफेड ,जन्मभर करत राहीन ,
पुढच्या पिढीला , संस्कारांचा वसा देऊन जाईन ।
लेक तुमची लाडकी मी, तुम्ही माझे पिता ,
सदैव आशिर्वादाचा हात डोक्यावर राहून देत ,हेच मागणे आता ।