छोटीशी राणी माझी
छोटीशी राणी माझी ,मोठी झाली खऱी,
जगातली सगळयात सुंदर ,तूच माझी परी।
इवलेसे पाय होते, इवल्याशा अदा,
अस्तित्वाने तुझ्या ,घर हसलं खदा खदा ।
लुकलुकीत डोळयांनी , जेव्हा प्रथम तू माझ्या कडे पाहिलं,
त्यांच क्षणी मी माझ संपूर्ण आयुष्य ,तुझ्या करता वाहिलं ।
शाळेच्या पहिल्या दिवशी ,झालीस जेव्हा तू दूर ,
डोळयातील आसवांना ,जणू आलाच होता पूर ।
पहिलं वहीलं बक्षीस तुझ ,डोळे भरून पाहिलं,
चेहेरया वरच हसूं तुझ ,आयुष्यभर मनात राहिलं ।
छोट्याश्या कागदावर जेव्हा ,चित्र तू काढायचीस,
असं वाटायच ,मनातल सगळं जग त्यावर सामावायचीस ।
नटखट तुझ्या अदा , लाघवी तुझा बोलणं,
वारयाच्या वेगाने ,तुझ रेस मधे पळणं ।
घुंगरांच्या तालावर ,कथ्थक चे बोल ,
भाव उमटायचे चेहरयावर तुझ्या ,जेव्हा गिरकी घ्यायचीच गोल ।
मित्र मैत्रीणींच्या गराडयात ,इतकी रमून जायचीस ,
जणू हेच माझ विश्व ,अस म्हणून जगायचीस ।
मायेच्या सावलीत ,खूप होतीस सुखात ,
खंबीर पणे उभ रहायचाय ,आता तुला या जगात ।
खूप मोठी होशील तू ,खात्री आहे याची ,
सदैव पाय जमिनी वरच राहून देत ,हीच इच्छा मनीची ।