असे भासे मस्कत
डोंगरांनी वेठलेले एक गाव, नाव असे मस्कत
रंग त्यांचे काळे, भुरकट, मातकट आणि फिकट
असतील का नेमले देवांनी त्यांना रक्षक ?
नाहीतर वाळूची झाली असती हि हि भूमी भक्षक
केली असेल का कधी तेथे ऋषी मुनींनी साधना
राहिले असतील का सजीव करून त्यांना वंदना ?
रस्ते म्हणजे होतो आपल्याकडील हायवेचा भास
१२० किलोमीटरच्या वेगाने सुखद होतो प्रवास
ह्या गावातली घरे सुंदर सुबक आणि ठेंगणी
नक्षीदार खिडक्यांच्या गोल गोल कमानी
चमचमत्या मॉल्सने छोट्या इंग्लंडचा आभास
जगातल्या प्रलोभनांचा असतो तिथे निवास
खजुराची तर हि आद्यभूमी, जन्मभूमी
कडुनिंबाच्या वृक्षांची जागोजाग पेरणी
ओमानी घरात दरवळतो धुपाचा सुगंध
अशा गावात झालेत सगळे मराठी दंग