भरकटलेलं एक पाखरू
फिरून घरी आलं
परतल्यावर घरी परत
त्या पंखांना बळ मिळालं
घरट्यातून बाहेर पडलेलं जेव्हा
तेव्हा केवढ हुरळून गेलेलं
स्वतंत्रंचे वारे पिऊन
तृप्त तृप्त झालेलं
उडत होते थवेच्या थवे
सगे सोबती होते नवे
पण अधुरेच वाटे जगणे
समजेना अजून काय हवे
अंधारले मग जरासे
मनीं त्याच्या काहूर माजे
आठवले त्याला मग त्याचे घरटे
जिथे त्याचे जन्मदाते एकटे
परतीची वाट मग वाटली
खूपच लांबच लांब
दाटून आला कंठ त्याचा
व्याकूळला जीव साचा
आठवली ती उब मायेची
अन चोचीतला तो घास
आकाश अफाट सोडून आला
फिरून रमला तो घरट्यात
Please reload
Recent Posts
Please reload