माझीया माहेरा
जा जा रे पाखरा माझीया माहेरा .. माझीया माहेरा
देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठ्वण......
जा जा रे पाखरा ...
जा जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा अगंणात आई माझी तुळशीला पाणी देई
हात जोडी बाई म्हणे , लेकीला ग सुख देई
सांग तिच्या कानामधें , जीव तिथे गुंतला ...
जा.. जा रे पाखरा ...
जा.. जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा ओसरीला बाबा माझा , चारा देई वासराला
मनामधी घालमेल , सांभाळ देवा लेकराला ...
सांग तू रे कानामधें , जीव ति
स्वप्न
स्वप्न रंगवतांना ,
दुः खाला जागाच नसते
सुखाच्या पावसात,
चिंबं चिंबं भिजायचे असते ... स्वप्नांच्या जगात,
कल्पनांची गर्दी असते
वर्तमान झेलताना,
काटयांशीच सलगी असते ... स्वप्न सत्यात उतरावतांना ,
दुः खाची साथ असते
सुखाच्या प्रत्येक क्षणाला ,
दुः खाचीच धार असते ... सुख शोधता शोधता ,
स्वप्न विरून जातं
दुःख भोगता भोगता,
आयुष्य संपून जातं ..आयु ष्य संपून जातं