वरदान
देवा मला वरदान दे पेरलं ते पिकेल एवढंच दान दे पोरंबाळं उपाशी झोपतात निदान पोटाची खळगी भरेल एवढं तरी धान दे ... म्हातारा बाप माझा आधीच राबून खंगला आहे त्याच्या डोळ्यात मरण्या आधी तरी समाधान दे ....देवा मला वरदान दे पेरलं ते पिकेल एवढंच दान दे बायको माझी शेतात राबून काळवंडली प्रत्येक रोपात तिने माया पेरली तिच्या हाताला निदान टीचभर बांगडी दे सुरकुतलेल्या हाताला तिच्या सुवासीनीच वाण दे ....देवा मला वरदान दे पेरलं ते पिकेल एवढंच दान दे राब राबतोय मी कष्टाला माझ्या चीज दे वेळेवर
लेक
लेक असते आपल्या ,बाबांची लाडकी राणी , मनातली तिची जागा ,घेऊच शकत नाही कोणी । मी सुध्दा माझ्या अप्पांच लाडक पिल्लू , हट्ट करायचे तेव्हा पासून ,जेव्हा अगदी होते टिल्लू । अप्पा म्हणजे आमचे ,मूर्तिमंत शिस्त , असूच शकत नाही त्यांच्या समोर ,घरातल कोणी बेशिस्त । लहानपणीच्या कष्टानीं त्यांना ,खूप काही शिकवलं, स्व-कष्टाने शिक्षण घेताना ,सर्वांगाने घडवलं । तुटपुंज्या पैशात भागवताना ,खूप झाली चढाओढ , आईच्या साथीने तरीही बसवली ,संसाराची घडी बिनतोड । झंजिनिअरींग च बीज ,हळूवार रूजवल आमच्या
छोटीशी राणी माझी
छोटीशी राणी माझी ,मोठी झाली खऱी, जगातली सगळयात सुंदर ,तूच माझी परी। इवलेसे पाय होते, इवल्याशा अदा, अस्तित्वाने तुझ्या ,घर हसलं खदा खदा । लुकलुकीत डोळयांनी , जेव्हा प्रथम तू माझ्या कडे पाहिलं, त्यांच क्षणी मी माझ संपूर्ण आयुष्य ,तुझ्या करता वाहिलं । शाळेच्या पहिल्या दिवशी ,झालीस जेव्हा तू दूर , डोळयातील आसवांना ,जणू आलाच होता पूर । पहिलं वहीलं बक्षीस तुझ ,डोळे भरून पाहिलं, चेहेरया वरच हसूं तुझ ,आयुष्यभर मनात राहिलं । छोट्याश्या कागदावर जेव्हा ,चित्र तू काढायचीस, अ